मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१

अल्फ्रेड बर्नहार्ड नोबेल .अल्फ्रेड नोबेल यांच्याविषयी माहिती.

 


                           अल्फ्रेड बर्नहार्ड नोबेल

जन्म       -  २१ ऑक्टोबर १८३३

मृत्यू        -  १० डिसेंबर १८९६

शोध        - डायनामाईट

नोबेल पुरस्कार समितीचे पितामह.

          अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म २१ऑक्टोबर १८३३ ला झाला.त्यांचं बालपण अतिशय गरिबीत गेलं. अशा परिस्थिती त्यांच्या वडिलांनी त्यांना रशियातील सेंट पितरबर्ग येथे शिकवले।तेथे उच्च शिक्षण घेतले.त्यांना लहानपणापासून विज्ञानात विशेष रस होता.उच्च शिक्षण घेत असताना अस्कानिओ सोब्रेरी (सोब्रिरो) या रसायनशास्त्रज्ञाचा त्यांचा मनावर खूप परिणाम झाला.कारण सोब्रेरी यांनी नायट्रोग्लिसरीन चा शोध लावला होता.

           नायट्रोग्लिसरीन हे बारुद पेक्षा खूप शक्तिशाली आहे.सोब्रेरी यांनी नायट्रिक असिडमध्ये ग्लिसरीन मिसळून एक शक्तिशाली स्फोटक तयार केले .यालाच 'नायट्रोग्लिसरीन'  म्हणतात.प्राध्यापक झिनिम यांच्या विज्ञान संशोधनापासून प्रेरणा घेऊन आपणही विज्ञान संशोधन कार्यात झोकून द्यावे असे नोबेल याना वाटले.

           नायट्रोग्लिसरीन पासून सुरक्षित आणि हाताळण्यास सोपे,सुलभ ठरावे असें स्फोटक शोधण्यात अल्फ्रेड नोबेल यांनी  आपले जीवन विज्ञान कार्यात वाहून घेतले.त्यांना त्यांच्या संशोधन कार्यात यश मिळाले व इसवी सन १८६३ साली अल्फ्रेड नोबेल यांनी 'डायनामाईट' नावाच्या शक्तिशाली विस्फोटकाचा शोध लावला.डायनामाईट तयार करण्यासाठी अल्फ्रेड नोबेल यांनी नायट्रोग्लिसरीन चा गंधकद्वारे विस्फोट करण्यात यश मिळविले.

          अल्फ्रेड नोबेल यांनी ३५० हुन अधिक पेटंट त्यांच्या नावे केले.व अल्पावधीतच संपूर्ण युरोपातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचे भाग्य त्यांना मिळाले.

          अल्फ्रेड नोबेल जीवनभर अविवाहित राहिले.अल्फ्रेड नोबेल यांच्या मनावर सुप्रसिद्ध कवी लॉर्ड बायनर यांच्या साहित्याचा परिणाम झाला.लगेच त्यांनी काही दिवसात ३१९ ओळींची कविता लिहिली.व ती प्रकाशित केली.

          १८६५ मध्ये डायनामाईट विस्फोटक म्हणून जगात विकण्यास सुरुवात झाली.डायनामाईट विस्फोटकांचा उपयोग विध्वंसक,लष्करी उद्देशासाठी,तसेच खोदकामासारख्या विधायक उद्देशासाठी या जगात होत आहे.डायनामाईट चा उपयोग सोईस्करपणे पहाड फोडण्यासाठी,रस्ते बांधणीसाठी व लष्करी कारवाईसाठी देखील होत आहे.

         आयुष्याच्या शेवटी अल्फ्रेड नोबेल यांनी पुरस्कार समितीची स्थापना केली व आपल्या संपत्तीचा काही भाग त्या समितीस दान केला.त्या पैशाच्या व्याजातून दरवर्षी भौतिकशास्त्र, रसायनशास्र,औषधीनिर्माणशास्र,साहित्य,जागतिक शांतता व १९६८ पासून अर्थशास्र या क्षेत्रात अलौकिक संशोधन करणाऱ्या जगातील कोणत्याही व्यक्तींना जगप्रसिद्ध नोबेल पुरस्कार १० डिसेंबर या दिवशी प्रदान करण्यात येतो.


        १९०१ पासून या नोबेल पुरस्काराला सुरुवात झाली.नोबेल पुरस्कारप्राप्त व्यक्तीला अल्फ्रेड नोबेल चे मेडल,प्रशस्तीपत्र आणि वीस कोटींचा धनादेश मिळतो.अल्फ्रेड नोबेलच्या स्मरणार्थ पिरिऍडीक टेबलमधील १०२ व्या मूलद्रव्याचे 'नोबेलीयम' असे नामकरण करण्यात आले.

       १० डिसेंबर १८९६ या दिवशी अल्फ्रेड नोबेल यांचे निधन झाले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

६ डिसेंबर १९५६ डॉ.बाबासाहेब आंबेस्कर यांचे महापरिनिर्वाण.

        डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या समाजाने भारतीय समाजव्यवस्थेमुळे खूप हाल अपेष्टा झेलल्या.त्यांचा आणि त्यांच्या समाजाचा एकच गुंन्ह...