गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

भोपाळ दुर्घटना विषयी संपूर्ण माहिती ।

        भोपाळची दुर्घटना ३ डिसेंबर १९८४ रोजी घडली.रात्री २ डिसेंबर संपल्यावर जेव्हा तीन डिसेंबर लागला तेव्हा रात्री सर्व रहिवासी झोपल्यावर ही घटना घडली. युनियन कार्बाईड या कंपनीचा कीटकनाशकांचा कारखाना भोपाळ येथे होता.आणि ज्या कीटकनाशकांचे उत्पादन ही कंपनी करत होती त्या कीटकनाशकांचा मुख्य घटक म्हणजे मिथाईल आयसोसायनेट नामक अतिविषारी पदार्थ.लोकांना रोजगार मिळेल म्हणून या कारखान्याला परवानगी मिळाली होती.


         १९८२ ला काही अमेरिकन तज्ज्ञांनी या कारखाण्याबाबत धोक्याचा इशारा सुद्धा दिला होता.तरी कोणी त्याची दखल घेतली नाही. ३ डिसेंबर ला थंडीच्या दिवसात शहरात खूप थंडी पडली होती.अशा वेळेस रात्रीच्या सुमारास या कारखान्यातील मिथाईल आयसोसायनेट हा विषारी पदार्थ शहरात पसरायला सुरुवात झाली.

           भोपाळ मधिल रहिवाशी यांना या अतिविषारी वायूमुळे त्रास व्हायला लागला.त्यांना घशातून खोकल्यासारखी उबळ येत होती.शरीरात प्रचंड दाह आणि त्रास व्हायला लागला.फुप्फुसात दाह निर्माण झाला.डोळ्यात जळजळ व्हायला सुरुवात झाली. डोळ्यात पाणी यायला लागले. लोकं ओरडू लागले होते.कोणी कोणाला ओळखू येईना.लोकांना काहीच समजत नव्हते.प्रत्येक जण उलट्या करत होते.लोकं सैरावैरा जिवाच्या आकांताने इकडेतिकडे पळू लागले होते.त्यात लहान मुले, म्हातारे, स्त्रिया,जवान लोकं असे सगळे होते. चेंगराचेंगरी सुरू झाली.यात खूप जण मेले.नंतर पोलिसांनी सूचना देण्यास सुरुवात केली.

           


या दुर्घटनेत १६००० (सोळा हजार ) लोक मेले तर २०,००० लोकं आंधळे झाले ,२,००००० लोकं जखमी झाले. देशात एवढी मोठी दुर्घटना कधीच झाली नव्हती.आणि या दुर्घटनेला जबाबदार या युनियन कार्बाईड कंपनीला धरले गेले.कंपनी ने कानावर हात ठेवले.जेव्हा चौकशी केली तेव्हा असे समजले की मिथाईल आयसोसायनेट हा पाण्याच्या संपर्कात आल्यावर अत्यंत विषारी बनतो.आणि तो पाण्याच्या संपर्कात येण्याचे कारण होते अप्रशिक्षित बेजबाबदार कामगार आणि कंपनीचा व्यवस्थापक.

           या वायूची गळती जेव्हा व्हायला लागली तेव्हा कामगार पळायला लागले त्यांना धोक्याची सूचना देण्याचे भान सुद्धा राहिले नाही.दीड तासात ४० टन मिथाईल आयसोसायनेट ने आणि इतर विषारी वायूनी भोपाळ शहरावर कब्जा केला.संपूर्ण शहरावर हो विषारी वायू पसरला.ही केस कोर्टात गेली नंतर कोर्टाने कंपनीला ४७ कोटी डॉलर ची भरपाई द्यावी लागली. त्यातील फक्त १० कोटी डॉलर रुपये पीडितांना मिळाले.

           

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

६ डिसेंबर १९५६ डॉ.बाबासाहेब आंबेस्कर यांचे महापरिनिर्वाण.

        डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या समाजाने भारतीय समाजव्यवस्थेमुळे खूप हाल अपेष्टा झेलल्या.त्यांचा आणि त्यांच्या समाजाचा एकच गुंन्ह...