शनिवार, ४ डिसेंबर, २०२१

६ डिसेंबर १९५६ डॉ.बाबासाहेब आंबेस्कर यांचे महापरिनिर्वाण.

     


 डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या समाजाने भारतीय समाजव्यवस्थेमुळे खूप हाल अपेष्टा झेलल्या.त्यांचा आणि त्यांच्या समाजाचा एकच गुंन्हा होता की त्या सर्वांनी भारतीय समाजव्यवस्थेतील अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजात जन्म घेतला होता.भारतीय समाजव्यस्थे मध्ये अशा काही जरी आहे त्यांना हिंदू समाज अत्यंत हिनतेची वागणूक देत होता.त्यांना गलिच्छ कामे करावी लागत होती. सवर्ण लोक स्वतःचा अंगावर,पाण्याच्या विहिरीवर ,घरांवर अस्पृश्य समाजातील लोकांची सावलीही पडू देत नव्हते.

       अशा अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या महार जातीत बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी सकपाळ होते . त्यांचे वडील सैन्यात अधिकारी होते. आई भीमाबाई चा मृत्यू झाल्यावर बाबासाहेबांची आत्या मीराबाई ने त्यांचा सांभाळ केला. शाळेत शिकत असताना त्यांना स्वतःला  उच्च वर्णीय समजणारे सवर्ण विद्यार्थी भीमरावांचा विटाळ करायचे .त्यांना वर्गात बसू देत नव्हते. बाबासाहेब हे वर्गाच्या बाहेर बसून शिकले .त्या शाळेत आंबेडकर नावाचे जातीने ब्राम्हण असलेले शिक्षक होते .ते बाबासाहेबाना खूप जीव लावत . बाबासाहेब शाळेत खूप हुशार होते . त्या शिक्षकांच्या अडनावावरून बाबासाहेबानी स्वतःचे आडनाव आंबेडकर असे ठेवले.


        पुढे बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक पास झाले .महार जातीतून मॅट्रिक पास होणारे ते पहिले व्यक्ती होते.भारत देशाची राज्यघटना बाबासाहेबानी लिहिली .त्यांनी MA ,Phd ,Dsc ,LLd ,D lit ,Bar at Law इत्यादी पदव्या आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मिळविल्या . नंतर ते विदेशात शिकायला गेले. चातुर्वर्णाच्या नावाखाली गेली पाच हजार वर्षे कोटीकोटी दलित बांधवाना कुत्रेमांजरे तर सोडाच पण डुक्कर आणि गाढवापेक्षा पण अत्यंत वाईट वागणूक इथल्या उच्चवर्णीयांनी दिली . तरीही अस्पृश्य समाज येथील हिंदू धर्माशी आणि देशाशी एकजूट राहिला .  उच्चवर्णीयांना याची जाण नव्हती . स्वातंत्रपूर्व भारतात हिंदू आणि मुस्लिम यांचे मासिहा आपणच अशी भूमिका गांधीजींनी घेतली होती . स्वतःला तर ते दलितांचा उद्धारकर्ताच समजत . पण त्याचा आणि त्यांच्या काँगेस चा हा ढोंगीपणा होता . महार समाज तरीही अन्यायाचे जीवन जगत होता .नंतर डॉ. बाबासाहेबानी अस्पृश्यासाठी त्यांच्या न्यायासाठी सत्याग्रह केले .

         चवदार तळ्याचा सत्याग्रह ,नाशिक च्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह यातून बाबासाहेबानी अस्पृश्य समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला .या साऱ्या अन्यायातून बाबासाहेबानी महार समाजाला मुक्त केले. १४ ऑक्टोबर १९५६ या दिवशी स्वतः बाबासाहेबानी त्यांच्या लाखो अनुयायांसोबत अन्याय करणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग केला आणि शांतता ,स्वतंत्र ,समता , बंधुता चा संदेश देणाऱ्या बौद्ध धम्माचा स्वीकार केला .

         महापुरुषांचा जन्मच मानवांच्या कल्याणासाठी होत असतो. तसे पाहिले तर बाबासाहेबांचे वय अवघे ६५ वर्षे .पण अस्पृश्यांच्या कल्याणासाठी हा देह मरेपर्यंत झिजला . ६ डिसेंबर १९५६ या दिवशी या महात्म्याने आपली भूलोकची जीवनयात्रा संपवली . ६ डिसेंबर च्या सकाळी साडे सहा वाजता माईसाहेब म्हणजे सविता आंबेडकर यांनी डॉ.बाबासाहेबाना झोपेरून उठवण्याचा प्रयत्न केला पण बाबासाहेब उठले नाही .हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांना धक्का बसला. त्यांनी बाबासाहेबांचे सेवक रत्तु याना बोलावले त्यांना पण धक्का बसला दोघांना रडू कोसळले .झोपतच बाबासाहेबांची प्राणज्योत मावळली होती .

         ही बातमी वनव्यासारखी दिल्लीपर्यंत परतली .पंतप्रधान नेहरू सकट अख्खे मंत्रिमंडळ त्यांच्या निवासस्थानी पोहोचले .आकाशवाणी वरून ही बातमी प्रसारित करण्यात आली .तेव्हा ह्या दुःखाची लाट साऱ्या भारतभर कोसळली .

        बाबासाहेबांचे पार्थिव एका खास विमानाने मुंबईला त्यांचा निवासस्थानी आणण्यात आले .त्यांच्या निवासस्थानाबाहेर लाखो अनुयायी जमले होते .जेव्हा बाबासाहेबांची अंत्ययात्रा निघाली तेव्हा त्या अंत्ययात्रेला जवळपास १० लाख जनसमुदाय होता .एवढे लोक कोणाच्याही अंत्ययात्रेला नाही जमले .सारी जनता रडत होती . लोक ' डॉ.बाबासाहेब आंबेडकर अमर रहे ' च्या घोषणा देत होते .घोषणांनी सारा आसमंत दुमदुमून निघाला .त्या दिवशी मुंबईतील शाळा , कॉलेज , रेल्वेसेवा चित्रपट गृह बंद ठेवण्यात आले होते .दुपारी दीड च्या सुमारास अंत्ययात्रेला प्रारंभ झाला होता .बाबासाहेबांवर बौद्धधम्म पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले होते.त्यांचे पुत्र यशवंतराव आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या चितेला अग्नी दिला होता .

         या अंत्यविधीला म्यानमार ,श्रीलंका या देशातील बौद्ध भिक्कु उपस्थित होते त्यांनी भाषणे केली होती . याचवेळी जवळपास एक लाख लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली .

       बाबासाहेबाना देशातील तसेच विदेशातील बौद्ध लोक हे बौद्ध गुरू मानत होते म्हणून बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या निधनाला बौद्ध रितीनुसार महापरिनिर्वाण असे म्हणतात.

         

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

६ डिसेंबर १९५६ डॉ.बाबासाहेब आंबेस्कर यांचे महापरिनिर्वाण.

        डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या समाजाने भारतीय समाजव्यवस्थेमुळे खूप हाल अपेष्टा झेलल्या.त्यांचा आणि त्यांच्या समाजाचा एकच गुंन्ह...