शनिवार, ४ डिसेंबर, २०२१

६ डिसेंबर १९५६ डॉ.बाबासाहेब आंबेस्कर यांचे महापरिनिर्वाण.

     


 डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या समाजाने भारतीय समाजव्यवस्थेमुळे खूप हाल अपेष्टा झेलल्या.त्यांचा आणि त्यांच्या समाजाचा एकच गुंन्हा होता की त्या सर्वांनी भारतीय समाजव्यवस्थेतील अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या समाजात जन्म घेतला होता.भारतीय समाजव्यस्थे मध्ये अशा काही जरी आहे त्यांना हिंदू समाज अत्यंत हिनतेची वागणूक देत होता.त्यांना गलिच्छ कामे करावी लागत होती. सवर्ण लोक स्वतःचा अंगावर,पाण्याच्या विहिरीवर ,घरांवर अस्पृश्य समाजातील लोकांची सावलीही पडू देत नव्हते.

       अशा अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या महार जातीत बाबासाहेबांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव भीमराव रामजी सकपाळ होते . त्यांचे वडील सैन्यात अधिकारी होते. आई भीमाबाई चा मृत्यू झाल्यावर बाबासाहेबांची आत्या मीराबाई ने त्यांचा सांभाळ केला. शाळेत शिकत असताना त्यांना स्वतःला  उच्च वर्णीय समजणारे सवर्ण विद्यार्थी भीमरावांचा विटाळ करायचे .त्यांना वर्गात बसू देत नव्हते. बाबासाहेब हे वर्गाच्या बाहेर बसून शिकले .त्या शाळेत आंबेडकर नावाचे जातीने ब्राम्हण असलेले शिक्षक होते .ते बाबासाहेबाना खूप जीव लावत . बाबासाहेब शाळेत खूप हुशार होते . त्या शिक्षकांच्या अडनावावरून बाबासाहेबानी स्वतःचे आडनाव आंबेडकर असे ठेवले.


        पुढे बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिक पास झाले .महार जातीतून मॅट्रिक पास होणारे ते पहिले व्यक्ती होते.भारत देशाची राज्यघटना बाबासाहेबानी लिहिली .त्यांनी MA ,Phd ,Dsc ,LLd ,D lit ,Bar at Law इत्यादी पदव्या आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मिळविल्या . नंतर ते विदेशात शिकायला गेले. चातुर्वर्णाच्या नावाखाली गेली पाच हजार वर्षे कोटीकोटी दलित बांधवाना कुत्रेमांजरे तर सोडाच पण डुक्कर आणि गाढवापेक्षा पण अत्यंत वाईट वागणूक इथल्या उच्चवर्णीयांनी दिली . तरीही अस्पृश्य समाज येथील हिंदू धर्माशी आणि देशाशी एकजूट राहिला .  उच्चवर्णीयांना याची जाण नव्हती . स्वातंत्रपूर्व भारतात हिंदू आणि मुस्लिम यांचे मासिहा आपणच अशी भूमिका गांधीजींनी घेतली होती . स्वतःला तर ते दलितांचा उद्धारकर्ताच समजत . पण त्याचा आणि त्यांच्या काँगेस चा हा ढोंगीपणा होता . महार समाज तरीही अन्यायाचे जीवन जगत होता .नंतर डॉ. बाबासाहेबानी अस्पृश्यासाठी त्यांच्या न्यायासाठी सत्याग्रह केले .

         चवदार तळ्याचा सत्याग्रह ,नाशिक च्या काळाराम मंदिराचा सत्याग्रह यातून बाबासाहेबानी अस्पृश्य समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला .या साऱ्या अन्यायातून बाबासाहेबानी महार समाजाला मुक्त केले. १४ ऑक्टोबर १९५६ या दिवशी स्वतः बाबासाहेबानी त्यांच्या लाखो अनुयायांसोबत अन्याय करणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग केला आणि शांतता ,स्वतंत्र ,समता , बंधुता चा संदेश देणाऱ्या बौद्ध धम्माचा स्वीकार केला .

         महापुरुषांचा जन्मच मानवांच्या कल्याणासाठी होत असतो. तसे पाहिले तर बाबासाहेबांचे वय अवघे ६५ वर्षे .पण अस्पृश्यांच्या कल्याणासाठी हा देह मरेपर्यंत झिजला . ६ डिसेंबर १९५६ या दिवशी या महात्म्याने आपली भूलोकची जीवनयात्रा संपवली . ६ डिसेंबर च्या सकाळी साडे सहा वाजता माईसाहेब म्हणजे सविता आंबेडकर यांनी डॉ.बाबासाहेबाना झोपेरून उठवण्याचा प्रयत्न केला पण बाबासाहेब उठले नाही .हे त्यांच्या लक्षात आले आणि त्यांना धक्का बसला. त्यांनी बाबासाहेबांचे सेवक रत्तु याना बोलावले त्यांना पण धक्का बसला दोघांना रडू कोसळले .झोपतच बाबासाहेबांची प्राणज्योत मावळली होती .

         ही बातमी वनव्यासारखी दिल्लीपर्यंत परतली .पंतप्रधान नेहरू सकट अख्खे मंत्रिमंडळ त्यांच्या निवासस्थानी पोहोचले .आकाशवाणी वरून ही बातमी प्रसारित करण्यात आली .तेव्हा ह्या दुःखाची लाट साऱ्या भारतभर कोसळली .

        बाबासाहेबांचे पार्थिव एका खास विमानाने मुंबईला त्यांचा निवासस्थानी आणण्यात आले .त्यांच्या निवासस्थानाबाहेर लाखो अनुयायी जमले होते .जेव्हा बाबासाहेबांची अंत्ययात्रा निघाली तेव्हा त्या अंत्ययात्रेला जवळपास १० लाख जनसमुदाय होता .एवढे लोक कोणाच्याही अंत्ययात्रेला नाही जमले .सारी जनता रडत होती . लोक ' डॉ.बाबासाहेब आंबेडकर अमर रहे ' च्या घोषणा देत होते .घोषणांनी सारा आसमंत दुमदुमून निघाला .त्या दिवशी मुंबईतील शाळा , कॉलेज , रेल्वेसेवा चित्रपट गृह बंद ठेवण्यात आले होते .दुपारी दीड च्या सुमारास अंत्ययात्रेला प्रारंभ झाला होता .बाबासाहेबांवर बौद्धधम्म पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले होते.त्यांचे पुत्र यशवंतराव आंबेडकर यांनी बाबासाहेबांच्या चितेला अग्नी दिला होता .

         या अंत्यविधीला म्यानमार ,श्रीलंका या देशातील बौद्ध भिक्कु उपस्थित होते त्यांनी भाषणे केली होती . याचवेळी जवळपास एक लाख लोकांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली .

       बाबासाहेबाना देशातील तसेच विदेशातील बौद्ध लोक हे बौद्ध गुरू मानत होते म्हणून बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर त्यांच्या निधनाला बौद्ध रितीनुसार महापरिनिर्वाण असे म्हणतात.

         

गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

भोपाळ दुर्घटना विषयी संपूर्ण माहिती ।

        भोपाळची दुर्घटना ३ डिसेंबर १९८४ रोजी घडली.रात्री २ डिसेंबर संपल्यावर जेव्हा तीन डिसेंबर लागला तेव्हा रात्री सर्व रहिवासी झोपल्यावर ही घटना घडली. युनियन कार्बाईड या कंपनीचा कीटकनाशकांचा कारखाना भोपाळ येथे होता.आणि ज्या कीटकनाशकांचे उत्पादन ही कंपनी करत होती त्या कीटकनाशकांचा मुख्य घटक म्हणजे मिथाईल आयसोसायनेट नामक अतिविषारी पदार्थ.लोकांना रोजगार मिळेल म्हणून या कारखान्याला परवानगी मिळाली होती.


         १९८२ ला काही अमेरिकन तज्ज्ञांनी या कारखाण्याबाबत धोक्याचा इशारा सुद्धा दिला होता.तरी कोणी त्याची दखल घेतली नाही. ३ डिसेंबर ला थंडीच्या दिवसात शहरात खूप थंडी पडली होती.अशा वेळेस रात्रीच्या सुमारास या कारखान्यातील मिथाईल आयसोसायनेट हा विषारी पदार्थ शहरात पसरायला सुरुवात झाली.

           भोपाळ मधिल रहिवाशी यांना या अतिविषारी वायूमुळे त्रास व्हायला लागला.त्यांना घशातून खोकल्यासारखी उबळ येत होती.शरीरात प्रचंड दाह आणि त्रास व्हायला लागला.फुप्फुसात दाह निर्माण झाला.डोळ्यात जळजळ व्हायला सुरुवात झाली. डोळ्यात पाणी यायला लागले. लोकं ओरडू लागले होते.कोणी कोणाला ओळखू येईना.लोकांना काहीच समजत नव्हते.प्रत्येक जण उलट्या करत होते.लोकं सैरावैरा जिवाच्या आकांताने इकडेतिकडे पळू लागले होते.त्यात लहान मुले, म्हातारे, स्त्रिया,जवान लोकं असे सगळे होते. चेंगराचेंगरी सुरू झाली.यात खूप जण मेले.नंतर पोलिसांनी सूचना देण्यास सुरुवात केली.

           


या दुर्घटनेत १६००० (सोळा हजार ) लोक मेले तर २०,००० लोकं आंधळे झाले ,२,००००० लोकं जखमी झाले. देशात एवढी मोठी दुर्घटना कधीच झाली नव्हती.आणि या दुर्घटनेला जबाबदार या युनियन कार्बाईड कंपनीला धरले गेले.कंपनी ने कानावर हात ठेवले.जेव्हा चौकशी केली तेव्हा असे समजले की मिथाईल आयसोसायनेट हा पाण्याच्या संपर्कात आल्यावर अत्यंत विषारी बनतो.आणि तो पाण्याच्या संपर्कात येण्याचे कारण होते अप्रशिक्षित बेजबाबदार कामगार आणि कंपनीचा व्यवस्थापक.

           या वायूची गळती जेव्हा व्हायला लागली तेव्हा कामगार पळायला लागले त्यांना धोक्याची सूचना देण्याचे भान सुद्धा राहिले नाही.दीड तासात ४० टन मिथाईल आयसोसायनेट ने आणि इतर विषारी वायूनी भोपाळ शहरावर कब्जा केला.संपूर्ण शहरावर हो विषारी वायू पसरला.ही केस कोर्टात गेली नंतर कोर्टाने कंपनीला ४७ कोटी डॉलर ची भरपाई द्यावी लागली. त्यातील फक्त १० कोटी डॉलर रुपये पीडितांना मिळाले.

           

मंगळवार, २३ नोव्हेंबर, २०२१

अल्फ्रेड बर्नहार्ड नोबेल .अल्फ्रेड नोबेल यांच्याविषयी माहिती.

 


                           अल्फ्रेड बर्नहार्ड नोबेल

जन्म       -  २१ ऑक्टोबर १८३३

मृत्यू        -  १० डिसेंबर १८९६

शोध        - डायनामाईट

नोबेल पुरस्कार समितीचे पितामह.

          अल्फ्रेड नोबेल यांचा जन्म २१ऑक्टोबर १८३३ ला झाला.त्यांचं बालपण अतिशय गरिबीत गेलं. अशा परिस्थिती त्यांच्या वडिलांनी त्यांना रशियातील सेंट पितरबर्ग येथे शिकवले।तेथे उच्च शिक्षण घेतले.त्यांना लहानपणापासून विज्ञानात विशेष रस होता.उच्च शिक्षण घेत असताना अस्कानिओ सोब्रेरी (सोब्रिरो) या रसायनशास्त्रज्ञाचा त्यांचा मनावर खूप परिणाम झाला.कारण सोब्रेरी यांनी नायट्रोग्लिसरीन चा शोध लावला होता.

           नायट्रोग्लिसरीन हे बारुद पेक्षा खूप शक्तिशाली आहे.सोब्रेरी यांनी नायट्रिक असिडमध्ये ग्लिसरीन मिसळून एक शक्तिशाली स्फोटक तयार केले .यालाच 'नायट्रोग्लिसरीन'  म्हणतात.प्राध्यापक झिनिम यांच्या विज्ञान संशोधनापासून प्रेरणा घेऊन आपणही विज्ञान संशोधन कार्यात झोकून द्यावे असे नोबेल याना वाटले.

           नायट्रोग्लिसरीन पासून सुरक्षित आणि हाताळण्यास सोपे,सुलभ ठरावे असें स्फोटक शोधण्यात अल्फ्रेड नोबेल यांनी  आपले जीवन विज्ञान कार्यात वाहून घेतले.त्यांना त्यांच्या संशोधन कार्यात यश मिळाले व इसवी सन १८६३ साली अल्फ्रेड नोबेल यांनी 'डायनामाईट' नावाच्या शक्तिशाली विस्फोटकाचा शोध लावला.डायनामाईट तयार करण्यासाठी अल्फ्रेड नोबेल यांनी नायट्रोग्लिसरीन चा गंधकद्वारे विस्फोट करण्यात यश मिळविले.

          अल्फ्रेड नोबेल यांनी ३५० हुन अधिक पेटंट त्यांच्या नावे केले.व अल्पावधीतच संपूर्ण युरोपातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनण्याचे भाग्य त्यांना मिळाले.

          अल्फ्रेड नोबेल जीवनभर अविवाहित राहिले.अल्फ्रेड नोबेल यांच्या मनावर सुप्रसिद्ध कवी लॉर्ड बायनर यांच्या साहित्याचा परिणाम झाला.लगेच त्यांनी काही दिवसात ३१९ ओळींची कविता लिहिली.व ती प्रकाशित केली.

          १८६५ मध्ये डायनामाईट विस्फोटक म्हणून जगात विकण्यास सुरुवात झाली.डायनामाईट विस्फोटकांचा उपयोग विध्वंसक,लष्करी उद्देशासाठी,तसेच खोदकामासारख्या विधायक उद्देशासाठी या जगात होत आहे.डायनामाईट चा उपयोग सोईस्करपणे पहाड फोडण्यासाठी,रस्ते बांधणीसाठी व लष्करी कारवाईसाठी देखील होत आहे.

         आयुष्याच्या शेवटी अल्फ्रेड नोबेल यांनी पुरस्कार समितीची स्थापना केली व आपल्या संपत्तीचा काही भाग त्या समितीस दान केला.त्या पैशाच्या व्याजातून दरवर्षी भौतिकशास्त्र, रसायनशास्र,औषधीनिर्माणशास्र,साहित्य,जागतिक शांतता व १९६८ पासून अर्थशास्र या क्षेत्रात अलौकिक संशोधन करणाऱ्या जगातील कोणत्याही व्यक्तींना जगप्रसिद्ध नोबेल पुरस्कार १० डिसेंबर या दिवशी प्रदान करण्यात येतो.


        १९०१ पासून या नोबेल पुरस्काराला सुरुवात झाली.नोबेल पुरस्कारप्राप्त व्यक्तीला अल्फ्रेड नोबेल चे मेडल,प्रशस्तीपत्र आणि वीस कोटींचा धनादेश मिळतो.अल्फ्रेड नोबेलच्या स्मरणार्थ पिरिऍडीक टेबलमधील १०२ व्या मूलद्रव्याचे 'नोबेलीयम' असे नामकरण करण्यात आले.

       १० डिसेंबर १८९६ या दिवशी अल्फ्रेड नोबेल यांचे निधन झाले.


गुरुवार, १८ नोव्हेंबर, २०२१

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे.महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या विषयी माहिती.

विठ्ठल रामजी शिंदे
जन्म        - २३ एप्रिल १८७३.
जन्मगाव   - जामखंडी (कर्नाटक ).
शिक्षण     - बी ए .
मृत्यू        - २ जानेवारी १९४४.
     ' प्रत्येक देव जर जरी अस्पृश्यता पाळायला लागला,तर मी त्याला देव मानणार नाही 'असे लोकमान्य टिळक म्हणत.' हिंदू धर्मात अस्पृश्यतेला जागा नाही 'असे महात्मा गांधींनी १९२० च्या नागपूरच्या अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषदेत म्हटले होते. अशा परिषदा, भाषणे ज्यांच्या प्रेरणेने संपूर्ण भारतात होत होती, ते प्रेरणास्थान होते 'विठ्ठल रामजी शिंदे '.
       विठ्ठल रामजी शिंदे यांच्या घरी कोणीच भेदाभेद पळत नव्हते.घराची दारे सर्वांसाठी खुली होती. विठ्ठल रामजी शिंदे १८९१ मध्ये मॅट्रिक पास झाले.नंतर पुढील शिक्षणासाठी ते मँचेस्टर ला गेले.तेथे काही काळ राहिल्यावर भारतात परतले.भारतात ते प्रार्थना समाजाशी जोडले गेले.त्यांना देशातील अस्पृश्यता नष्ट करायची होती.पण या कामात प्रार्थना समाज आडवा येत होता.म्हणून त्यांनी प्रार्थना समाज सोडला आणि त्यांनी डिस्प्रेस क्लास मिशन चे कार्य सुरू केले.
       पुढे त्यांनी १९१२ मध्ये मिशन चे कार्यालय मुंबई हुन पुण्याला हलवले.पुण्यात त्यांना तुकोजी होळकर,रँग्लर परांजपे यांचे सहकार्य लाभले.संस्था प्रगती करत होती.पण काही सनातनी लोकांना त्यांचे अस्पृश्यता निवारण्याचे कार्य पटले नाही.हरीजनांची सेवा हरीजनांनीच करावी इतरांनी नव्हे असे म्हणून सनातनी लोक त्यांच्यावर दबाव टाकू लागले.म्हणून त्यांनी संस्थेत काम करणे सोडून दिले.तिचा कारभार एका नियामक मंडळावर सोपवला.त्यांच्या ह्या त्यागी वृत्तीमुळे त्यांना महर्षी ही पदवी प्राप्त झाली.
        मिशनचे कार्य सोडल्यावर महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ब्राम्हो समाजाचे कार्य करू लागले.ते दक्षिणेत त्रावणकोट ला गेले.तेथे त्रावणकोट संस्थानातील वायक्कम या गावचा मंदिर प्रवेश खूप गाजला.या मंदिरात अस्पृश्य सोडून सर्वाना प्रवेश करता येत होता.त्याला या सत्याग्रहाला गांधीजी पाठिंबा देतील असे त्यांना वाटले होते.पण त्यांची ही आशा फोल ठरली.
       महर्षींनी याविषयी गांधीजींना परखड शब्दात सुनावले.त्यांनी गांधींना पत्र लिहिले आणि म्हटले " तुमच्या मनात खादीला पाहिले ,हिंदू मुस्लिमाना दुसरे आणि अस्पृश्यतेला शेवटचे स्थान आहे पण माझ्या मनात अस्पृश्यता निवरण्याला पहिले स्थान आहे ". 
       कर्नाटकच्या सीमेवर आढळणारी देवदासी आणि मुरळी ची प्रथा सोडवण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले.यासाठी त्यांनी त्यांच्या जन्मगावचा रोष पत्करला.त्यांना गाव सोडावे लागले.समाजकार्यासोबतच ते राजकारणात पण पुढे होते. १९३० च्या सविनय कायदेभंगात त्यांना सहा महिने कारावास सुद्धा झाला होता.कारागृहात आजारी पडले.त्यांनी सुटकेसाठी कोणताही लाचारी पत्करली नाही.
      कारागृहात असताना त्यांनी आपल्या आठवणी लिहून ठेवल्या.खूप आजारी पडले.ठक्करबाप्पा, कर्मवीर भाऊराव पाटील असे अनेक लहान थोर समाजसेवक त्यांना भेटायला येत.त्यांच्या आयुष्याचे शेवटचे दहा-बारा वर्षे आजारपणात गेले.१९३४ साली मुंबईतील संस्थांनी त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांना मानपत्र दिले. २ जानेवारी १९४४ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

६ डिसेंबर १९५६ डॉ.बाबासाहेब आंबेस्कर यांचे महापरिनिर्वाण.

        डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या समाजाने भारतीय समाजव्यवस्थेमुळे खूप हाल अपेष्टा झेलल्या.त्यांचा आणि त्यांच्या समाजाचा एकच गुंन्ह...